Breaking News

केज अत्याचार प्रकण: नराधमास तीन दिवसांची पोलीस कोठडी

गौतम बचुटे । केज
तालुक्यातील तांबवा येथें एका चोवीस वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन एका नराधमाने अत्याचार केल्याच्या घटनेतील आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ९ जुलै रोजी दुपारी २:०० वा.दरम्यान  केज तालुक्यातील तांबवा या गावात एक खाजगी नौकरी करणाऱ्या चोवीस वर्षीय तरुणीवर गावातील गोरख रावसाहेब लांब या नराधमाने त्याच्या राहत्या घरात तिला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने वारंवार बलात्कार केला होता. तसेच वाच्यता केल्यास किंवा कुणाला सांगितले तर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या प्रकरणी दि.१४ जुलै रोजी पीडित तरुणीने स्वतः हजर होऊन केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार गोरख रावसाहेब लांब या नराधमावर गु. र. नं .२६७/२०२० भा. द. वि. ३७६, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी आरोपी गोरख रावसाहेब लांब आरोपीला तात्काळ  अटक केली होती. दरम्यान आज दि. १५ जुलै रोजी आरोपीला केज न्यायालयात समोर हजर केले असता त्याला दि. १७ जुलै पर्यंत अधिक तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

No comments