Breaking News

लॉकडाऊनमुळे महिलांसाठी केजचे बस स्थानक असुरक्षित

तरुणीला गावाकडे सोडण्याच्या बहाण्याने मोटार सायकल बसवून लगट करण्याचा प्रयत्न
साळेगाव येथे नागरिक आणि पत्रकारांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला : केज पोलिसात गुन्हा दाखल
गौतम बचुटे । केज 
वाहने बंद असल्यामुळे तुला तुझ्या गावी सोडतो असे  म्हणून गैरसोयीचा गैरफायदा घेऊन एका तरुणीला मोटार सायकलवर बसवून तिला फसवण्याचा प्रयत्न साळेगाव येथील नागरिक आणि पत्रकारामुळे उगडकीस आला. दरम्यान आज या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


या बाबतची माहिती अशी की, दि. १३ रोजी एक २०-२१ वर्षाची तरुणी सायं. ७:३० वाजण्याच्या सुमारास जामखेड येथून कळंबकडे जाण्यासाठी केज बस स्टँडवर वाहनांची प्रतीक्षा करीत थांबली होती. मात्र लॉक डाउनमुळे कळंबला जाण्यासाठी एसटी किंवा इतर वाहन नसल्याने तिने एक ऑटो रिक्षावाल्याला कळंबला सोडण्यासाठी भाडे ठरविले. मात्र ती तरुणी एकटी व संकटात असल्याचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने त्या रिक्षाचालक तरुणाने तिचा विश्वास संपादन करून म्हणाला की, मी तुला ऑटो रिक्षा ऐवजी मोटार सायकल वरून कळंबला सोडतो. म्हणून त्याने त्याच्या एका मित्रांसह त्या तरुणीला मोटारसायकलवर बसविले. परंतु गावाच्या बाहेर जाताच त्याने वाईट हेतूने तिच्या अंगाला स्पर्श करू लागला. हा 'बॅड टच' जाणवताच तरुणीने त्यांना विरोध केला आणि गाडीवरून उतरण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यावेळी केज-कळंब महामार्गावरील साळेगाव हे जवळ आले होते. साळेगावच्या बस स्टँडवर त्यांना नागरिक दिसताच त्यांनी त्या तरुणीला साळेगाव येथे सोडून पळून गेले. नंतर त्या तरुणींनीने घडलेला प्रसंग उपस्थित नागरिक व पत्रकार यांना कळविताच केज पोलीस स्टेशन व त्या तरुणीच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. ती तरुणी प्रचंड घाबरली होती व रडत होती. त्यावेळीं सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी तिला धीर दिला आणि तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून तिचे नातेवाईक येताच तिला तिच्या भावाच्या ताब्यात दिले.
दरम्यान सदर तरुणीने दि.१४ जुलै रोजी केज पोलीस स्टेशनला हजर होऊन घडलेल्या प्रकारची रितसर लेखी तक्रार दिली असून गु र नं २६९/२०२० भा दं वि ३५४ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रुक्मिणी पाचपिंडे या तपास करीत आहेत. तसेच पोलीस मोबाईल नंबर व सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास करीत असल्याचे समजते आहे.

सदर तरुणी ही घाबरली असल्याने तिने कळंब येथे पोहोचताच तेथील पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवून घेण्याची विंनती केली पण तेथील अधिकाऱ्यांनी गुन्हा आमच्या हद्दीत नसल्याचे सांगून तक्रार नोंदवून घेतली नसल्याची माहिती तिने दिली.

या प्रकरणातील संशयित तरुणाने रिक्षाचे भाडे हे गुगल पे द्वारे अदा करण्यासाठी मोबाईल नंबर दिला होता. त्या मुळे गुन्हेगाराचा तपास करणे पोलीसांना शक्य आहे.

महिलांनी अशा वेळी कुठे अडकुन पदल्यास घाबरून जाऊ नये किंवा अनोळखी इसमावर विश्वास ठेवू नये. त्यांनी पोलिसांना कळविल्यास त्यांना सुरक्षित घरापर्यंत पोहचविले जाईल. असं केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन म्हणाले.

No comments