Breaking News

महिलेला घरात घुसून केली दगडाने मारहाण : सहाजणांविरोधात गुन्हा दाखल


गौतम बचुटे । केज :

तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री येथे सहा जणांनी एका महिलेच्या घरात घुसून तिला दगडाने मारहाण करून जखमी केले या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तरेश्वर पिंप्री ता. केज येथे समाधान शिवाजी धिवार, अक्षय अशोक धिवार, बंटी अशोक धिवार, अभिजीत चंद्रभान खाडे, दादासाहेब बापु धिवार आणि अक्षय शहाजी बहिर या सहाजणांनी लक्ष्मी दत्तात्रय धेंडे वय ३४ वर्ष रा. उत्तरेश्वर पिंप्री ता. केेेज यांच्या घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच हातातील दगड फेकुन मारून दुखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिली. लक्ष्मी धेंडे यांच्या मुलांना पण लाथाबुक्याने मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या साक्षीदारासही दगड मारून दुखापत केली. 


या प्रकरणी लक्ष्मी धेंडे हिच्या फिर्यादी नुसार समाधान शिवाजी धिवार, अक्षय अशोक धिवार, बंटी अशोक धिवार, अभिजीत चंद्रभान खाडे, दादासाहेब बापु धिवार रा सर्व काळेगाव (घाट) आणि अक्षय शहाजी बहिर रा. उत्तरेश्वर पिंप्री यांच्या विरोधात गु. र. नं. २६६/२०२० भा. दं. वि. ३०८, ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९ आणि २६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत.

No comments