Breaking News

विड्या जवळील भोसले वस्तीवर घरात घुसून साडेचार लाख रु. ची चोरी : दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात


गौतम बचुटे। केज 
केज तालुक्यातील विड्या जवळील भोसले वस्तीवर ओळखीचा फायदा घेऊन एका महिलेच्या घरात घुसून साडेचार लाख रु. ची चोरी केल्याची घटना घडली. पोलिसांनी तातडीने या गुन्ह्यातील संशयित शहादेव आधुबा बायबसे, रामेश्वर सुंदर वायबसे या दोघांना या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

या बाबतची माहिती अशी की, विड्या पासून जवळच असलेल्या भोसले वस्तीवर अनिता सदाशिव आंधळे या सव्वीस वर्षीय विवाहिता व तिचे सासरे घरी असताना दि. ६ जुलै रोजी सायंकाळी ७:३० वा. शहादेव आश्रुबा बायबसे, रामेश्वर सुंदर वायबसे, अशोक सुंदर बायबसे व खंडु गोविंद वायबसे सर्व रा नामेवाडीता केज ओळखीचा फायदा घेवून अनिता वायबसे हिच्या घरी गेले. त्यावेळी शहादेव आश्रूबा वायबसे यांनी अनिताच्या सासऱ्याला शिवीगाळ करून घरात घुसून पेटीतील चार लाख एकोण पन्नास हजार पाचशे रु चोरून नेले. तसेच अनिताच्या आंधळे हिच्या नवऱ्याचे पाय मोडून टाकीन अशी धमकी दिली. तसेच रामेश्वर सुंदर वायबसे, अशोक सुंदर बायबसे व खंडु गोविंद वायबसे यांनी तिच्या सासऱ्याला लाथा-बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. अनिता सदाशिव आंधळे हिच्या फिर्यादी वरून शहादेव आश्रुबा बायबसे, रामेश्वर सुंदर वायबसे, अशोक सुंदर बायबसे व खंडु गोविंद वायबसे या चार जणांच्या विरोधात गु. र. नं. २६२/२०२० भा. दं. वि. ४५२, ३२७, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.  पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत. पोलीसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून यातील संशयित शहादेव आश्रुबा बायबसे, रामेश्वर सुंदर वायबसे या दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

No comments