Breaking News

राजगृहावरील हल्ल्याच्या निषेधार्थ केजमध्ये रिपाइंचे निदर्शने


गौतम बचुटे । केज 
 राजगृहवरील भ्याड हल्ल्यातीलहल्लेखोरला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावर आणि त्याला प्रवृत्त करणाऱ्यावर  देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी या आणि इतर मागण्यासाठी केज येथे रिपाइंच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

दादर येथील महामानव भारतीय राज्यघटनेचे निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान 'राजगृहावर माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे. या घटनेचा तीव्र निषेधार्थ व महाविकास आघाडी सरकारच्या काळात दलीत व बौद्धावर होत असलेल्या अन्याय,अत्याचाराच्या विरोधात युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पुजी कागदे यांल आणि केज येथे तालुका अध्यक्ष दिपकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालयावर उपस्थित कार्यकर्त्यांनी मास्क लावून आणि सोशल डिस्टनसिंग पाळून आंदोलन आले.
या प्रसंगी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्यात यावे. राजगृहावरील हल्लेखोरस आणि त्याला  प्रवृत्त करणाऱ्यास ताब्यात घेऊन त्याला देशद्रोही ठरवून त्याला कठोर शासन करण्यात यावे. राज्यात झालेले दलीत हत्याकांड आणि अत्याचाराची प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवून त्यांना कठोर शासन करावे. दलित समाज दरोडेखोर नसताना किंवा त्यांची गुन्हेगारीचा पूर्व इतिहास नसताना त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही अट्रोसिटीचे गुन्हे दाखल करून सहआरोपी करण्यात यावे. तालुक्यातील अतिक्रमित गायरान जमिनी, दलित स्मशानभूमी आणि घरकुल व दलित वस्तीविकासाची प्रकरणे निकाली काढण्यात यावीत. दलित वस्ती विकासाचा निधी दलित वस्त्यात न खर्च करता इतरत्र खर्च करणाऱ्या ग्रामपंचायती बरखास्त करून सरपंच व अधिकाऱ्यावर अट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. दलितांना विविध योजनां पासून वंचीत ठेवणाऱ्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर अट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. संवेदनशील दलित वस्त्यांना संरक्षण देण्यात यावे. इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर दिपकभाऊ कांबळे, गौतम बचुटे,बाळासाहेब ओव्हाळ, विकास आरकडे रामजी मस्के, सुशील कांबळे, रोहित कांबळे, बाळासाहेब कांबळे, लिंबराज जाधव, रवी शिनगारे, सुमित कांबळे, रवी गायसमुद्रे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments