Breaking News

जिल्ह्यातील भूमिहीन गायरान धारक आणि सुशिक्षित बेरोजगारांना विना अट तात्काळ कर्जाचे वितरण करा- किशन तांगडे

लीड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक  कदम यांनी दिले
साकारात्मक विचार करण्याचं आश्वासन 

बीड : बीड जिल्ह्यातील भूमिहीन गायरान धारक शेतकऱ्यांना ही पीक कर्ज मिळावं. तसेच बेरोजगारांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी बँकांकडून विना आट कर्ज मिळावे. अशी मागणी रिपाइंचे बीड तालुकाध्यक्ष किशन तांगडे यांनी लीड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीधर कदम यांच्याकडे गुरुवारी केली. यावेळी श्री. कदम यांनी याबाबत साकारात्मक विचार करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील भूमिहीन गायरान धारक व बेरोजगारांच्या समस्यांची कैफियत मांडण्यासाठी रिपाइंचे बीड तालुकाध्यक्ष किशन तांगडे यांनी जिल्हा अग्रणी बँकचे कर्तव्यदक्ष "जिल्हा व्यवस्थापक श्रीधर कदम यांची भेट घेतली. यावेळी किशन तांगडे यांनी"एकी"ला नोंदी असणाऱ्या आणि भूमिहीन गायरान धारकांनी ताबा मिळवून वहिती केलेल्या"गायरान जमिनी"वर सरसकट विना अट "पीक कर्ज" मिळावे,(जिल्ह्यातील बहुंताश बँका ह्या निरुस्ताही आणि अडेलतट्टू भूमिके मुळे पीक कर्ज मिळत नाही.) तसेच "सुशिक्षित बेरोजगारांना" आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशाची अत्यंत गरज आहे,पण यांना देखील "लॉकडाऊन च्या" नावाखाली जिल्ह्यातील बहुतांश बँका ह्या जाणीव पूर्वक टाळत आहेत,या सर्व बँकांना आपण तंबी देऊन"भूमिहीन गायरान धारक" आणि "सुशिक्षित बेरोजगारांना" कर्ज मिळवून देण्यासाठी आदेशित करावे,अशी मागणी रिपाई चे बीड तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांनी लावून धरली असता श्रीधर कदम साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या आठ दिवसांत सर्वच बँकांची एक बैठक घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून यातून काही तरी मार्ग काढू , असे सांगितले. 
                         

No comments