Breaking News

दारूसाठी उपसरपंचाने एकाला झोडपले!

युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
गौतम बचुटे । केज
तालुक्यातील जवळबन येथे उपसरपंच आणि त्याचे तीन साथीदार यांनी संगनमत करून दारूची पार्टी करण्यासाठी का पैसे देत नाहीस ? म्हणून एकास लाकडी दांड्याने व लोखंडी टॉमीने गंभीर मारहाण करून दहा हजार रु. काढून घेतले. या प्रकरणी केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील जवळबन येथील शिवाजी चौकात 11 जुलै रोजी सायंकाळी ५:३० च्या दरम्यान प्रशांत दिगंबर करपे यांस उपसरपंच प्रमोद श्रीराम करपे आणि त्याचे साथीदार प्रदीप श्रीराम करपे, अमोल श्रीराम करपे आणि अमोल उर्फ बापु शिवाजी करपे या चौघांनी आम्हांला दारू पिण्यासाठी पैसे मागितले आणि पार्टी करण्यासाठी ५ हजार रू. का देत नाहीस ? म्हणुन प्रशांत करपे यास अडवुन जिवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी टिकावाच्या दांडयाने व ट्रॅक्टरच्या लोखंडी टॉमीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेेेच त्यांच्या डोळयाखाली छातीवर, डोक्याला मारहाण करून मुक्कामार दिला व खिशातील १० हजार रू. रोख रक्कम जबरीने काढुन घेतले.

प्रशांत करपे यांनी दि.१६ जुलै रोजी युसूफ वडगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून उपसरपंच प्रमोद श्रीराम करपे आणि त्याचे साथीदार प्रदीप श्रीराम करपे, अमोल श्रीराम करपे आणि अमोल उर्फ बापु शिवाजी करपे या चौघां विरुद्ध गु. र. नं. १४७/२०२० भा. दं. वि. ३०७, ३९४, ३४१, ३२३ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

युसुफवडगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे हे पुढील तपास करीत आहेत.

No comments