Breaking News

पाटोदा नगरपंचायतचा मुख्याधिकारी 60 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला


चालकाला घेतले ताब्यात; एसीबीची कारवाई

बीड : केलेल्या कामाचे बील अदा करण्यासाठी तब्बल 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना  पाटोदा नगरपंचायतचा लाचखोर मुख्याधिकाऱ्यासह अन्य एकाला एसीबीने  रंगेहाथ पकडले. 


पाटोदा शहरात केलेल्या कामाचे बिल अदा करण्यासाठी नगरपंचायत चा मुख्याधिकारी शशिकांत भोसले याने 60 हजारांची लाच मागितली होती. दरम्यान याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाल्यानंतर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे व त्यांच्या टीमने सोमवारी (दि.20) सायंकाळी 7 वाजण्याच्या सापळा रचला असता  मुख्याधिकारी शशिकांत भोसले याच्या सह त्याच्या ड्रायव्हरला 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.


No comments