Breaking News

परळीत तपासणीसाठी घेतले 534 जणांचे स्वॅब

परळी : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर इतर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून शहर लॉक डाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परळीत शुक्रवारी (दि.१०) 534 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. 

परळी येथिल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचार्‍यांच्या संपर्कात आलेल्या १५०० लोकांची प्रशासनाने यादी तयार केली होती त्या यादीच्या अनुषंगाने परळी व परळी शहरातील ५३४ स्वॅब जणांचे स्वॅब घेण्यात आले. परळी सारख्या छोटया शहरामध्ये मोठया प्रमाणात स्वॅब घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिनेश खुळमे,ता.आरोग्य अधिकारी डॉ.मोरे,यांच्यासह डॉक्टर,कर्मचारी,तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्यासह न.प.प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी व पोलिस निरीक्षक हेमंत कदम, बालासाहेब पवार,यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि संबंधित कर्मचार्‍यानेही अथिक परिश्रम घेतले.

No comments