Breaking News

बीड शहर अनलॉक मात्र 11 भाग कंनटेन्मेंट झोन मध्ये


बीड : गेल्या सात दिवसापासून लॉकडाऊन असलेले बीड शहर आज पासून अनलॉक झाले आहे. त्यामुळे बाजारपेठा पूर्ववत सुरू होणार असून शहरातील व्यवहार सुरळीत सुरु होतील. मात्र शहरातील 11 भाग कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून या परिसरात संचार बंदी शुक्रवारी लागू करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी रात्री उशीरा आदेश काढून बीड शहरातले लोकडाऊन आज उठवले. शुक्रवार पासून बीड शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरु होतील. मात्र कोरोनाच्या अनुषंगाने शहर वासियांना प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करण बंधनकारक असेल त्याच बरोबर शहरातील इंद्रप्रस्थ कॉलनी, असेफनगर, बीड मामाला विद्दानगर पूर्व चा काही भाग, बळीराजा कॉम्प्लेक्स, गोपाळ आपारमेंट, परवाना नगर, मोमीनपुऱ्याचा काही भाग कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित केला असून हे परिसर बंद राहतील. असे ही जिल्हाधिकारी रेखावार यांनी आदेशात नमूद केले आहे.

No comments