Breaking News

बीडचा अजिजपुरा व दत्त मंदिर समोरील गल्ली कन्टेनमेंट झोनप्रतिकात्मकपरिसरात पूर्णवेळ संचारबंदी लागू-जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची माहिती
बीड : शहरातील दत्तनगर व अझीझपुरा येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेले  रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

बीड शहरातील  अजिजपुरा येथे १  रुग्णास आणि  दत्त मंदिर समोरील गल्ली येथे १ रुग्णास  कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे . त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अजिजपुरा  येथील काझी सय्यद फजलोद्दीन मिली यांचे घर  ते  सय्यद अमिनुद्दिन  सय्यद  नझिरोद्दीन यांच्या घरा पर्यंतचा परिसरात कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले.
 तसेच दत्त मंदिर समोरील गल्ली येथे शिवाजी सुदाम भोसकर  यांच्या घरापासून ते मिर्झा मुस्ताक बेग यांचे घरापर्यंत या परिसरात कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आला आहे. आणि दोन्ही परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविला असल्याने  त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

No comments