Breaking News

खत वाहतूकचे स्टिकर लावून दारूचा ट्रक पळवला!


पत्रकार आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ट्रक पकडला 
 गौतम बचुटे । केज 
पुणे येथून जळकोट येथे देशी दारू घेऊन व दर्शनी भागावर खत विक्री असे  बनावट स्टिकर लावून देशी दारूची वाहतूक करणारा ट्रक चक्क एका दारुड्या ड्रायव्हरच्या दारुड्या मित्राने पळवून नेला. तो ट्रक शंभर कि.मी. अंतरा पर्यंत घेऊन आला. परंतु केज येथील पत्रकारांच्या सतर्कतेमुळे ट्रक पकडून मुद्देमालासह तो पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.


या बाबतची माहिती अशी की, कळंब तालुक्यातील हळदगाव येथील सोमनाथ सावंत यांची ट्रक आहे. सदर ट्रक क्र (एम एच १२/ सी टी-४०२५) हा ड्रायव्हर कैलास रसाळ व त्याचा मित्र मुबारक तांबोळी रा. ढोकी याला सोबत घेऊन हडपसर पुणे येथे गेले. हडपसर तेथून त्यांनी सिमला देशी दारू ट्रकमध्ये भरली. तो ट्रक घेऊन व समोरून डाव्या बाजूच्या काचेवर 'अत्यावश्यक सेवा खत वाहतूक' असे कागदी स्टिकर चिटकवून ते लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील गोडाऊनकडे निघाले. मात्र ते दोघे रस्त्यात कुर्डुवाडी जवळील म्हैसगाव जवळ येताच दोघे भरपुर दारू
पिले. नंतर दोघात भांडण झाले आणि  कैलास याला म्हैसगाव येथे सोडून मुबारक तांबोळी याने दारूच्या नशेत ट्रक पळवून घेऊन आला. त्याचा उद्देश दारू विक्री करण्याचा होता. इकडे कैलास रसाळ याने ट्रक मालक सोमनाथ सावंत याच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. मुबारक हा दारूने भरलेला ट्रक घेऊन फरार झाला असल्याची माहिती दिली. त्या नंतर सोमनाथ सावंत यांनी आपल्या मित्रा आणि नातेवाईकांना याची माहिती दिली. त्या नंतर सोमनाथच्या नातेकानी तो ट्रक केज तालुक्यातील साळेगावच्या बाजार तळावर पाहिला.  त्या नंतर तो पर्यंत अनेक लोक जमा झाले होते. त्यांनी ट्रकला घेरले. नंतर पत्रकार गौतम बचुटे व अझीमोद्दीन इनामदार यांनी केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्याशी संपर्क साधला आणि या गंभीर घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे आणि त्यांचे सहकारी अमोल गायकवाड, मतीन शेख, हनुमंत चादर हे फौज फाट्यासह साळेगाव येथे हजर झाले. पोलिसांनी गर्दी पांगविली व ट्रक पळविणारा मुबारक तांबोळी याला ताब्यात घेऊन त्याला सोबत घेवुन आणि ट्रक मालक सोमनाथ  सावंत याला ट्रक घेऊन केज पोलीस स्टेशनला आले. तसेच दारुच्या माला बाबत चौकशी केली असता तो माल अधिकृत असून त्याची वाहतुकीचे सर्व परवाने देखील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अशी माहिती मिळाली. सदर माल ताब्यात घेण्यासाठी जळकोट येथील गोडावून मालक तेलंग देखील केज येथे पोलीस स्टेशनला हजर झाले आहेत.
या घटनेच्या संदर्भात पत्रकार आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे सुमारे दहा लाख रु. किमतीचा माल सुखरूप राहिला या बद्दल पत्रकार गौतम बचुटे, अझीमोद्दीन इनामदार आणि समीर तांबोळी, राजाभाऊ माने व समाधान इंगळे यांचे कौतुक होत आहे.

【★】जर ट्रक कायदेशीर दारू वाहतुकीचा  परवाना असेल तर मग त्याला खत वाहतूक अत्यावश्यक सेवेचे स्टिकर का?

【★】सदर दारूचा ट्रक हा सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी जवळील म्हैसगाव येथून बेपत्ता झाला तर मग त्या पोलीस स्टेशनला ड्रायव्हरने तक्रार का दिली नाही ?

No comments