इंडिया नाव बदलून हिंदुस्तान ठेवावे या मागणीच्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी तहकूब

सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार होती. पण सीजेआय बोबडे मंगळवारी रजेवर असल्याने ती पुढे ढकलण्यात आली. यापूर्वी शुक्रवारी सुनावणी 2 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली होती.
नुकतीच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून अशी मागणी केली गेली होती, की देशाला इंडिया नावाने संबोधित केले जाऊ नये तर हिंदुस्तान किंवा भारताच्या नावावर संबोधले जावे. यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचे निर्देश सरकारला दिले जावेत. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. भारत किंवा हिंदुस्थान या शब्दामुळे आपल्या देशाबद्दल अभिमान वाटतो असे या याचिकेत म्हटले आहे.
देशाला भारत किंवा हिंदुस्थान असे संबोधून इंडिया हा शब्द काढून घटनेच्या कलम १ मध्ये सुधारणा करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची विनंती याचिकेद्वारे सरकारला केली आहे.
No comments