Breaking News

कानडी माळीत भूमिहीनांना गायरान कसण्यास मातब्बरांचा विरोध

जमिनीवर टाकले दगड-गोटे; भूमिहीनांची पोलिसात धाव
केज : गेल्या अनेक वर्षांपासून गायरान जमिन कसून कानडी माळी (ता. केज) येथील एक भूमिहीन शेतकरी आपला प्रपंच चालवत आहे. मात्र ही बाब गायरानाच्या शेजारी असलेल्या मातब्बर यांना खटकत आहे. दरम्यान यंदा गायरान कसून काळी आईची औटी भरणासाठी त्या भूमिहीनाने तयारी केली. परंतु गायरानाच्या शेजारील मातब्बरांने तिथं दगड-गोट्याचा खच टाकून भूमिहीनांना गायरान कसण्यास विरोध केला आहे. भूमिहीन शेतकऱ्याने पोलिसात धाव घेऊन यांनी या प्रकरणी उच्चीत न्याय करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, की  केज तालुक्यातील कानडी माळी येथील मागासवर्गीय जातीतील सोपान किसन खाडे हे भूमिहीन असून ते मागील अनेक वर्षांपासून सरकारी गायरान अतिक्रमण करून कसत आहेत. त्यातून ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. दि.३१ मे रोजी सोपान खाडे हे खरीप हंगामासाठी पूर्वमशागत करण्यासाठी अतिक्रमित गायरान जमिनीत गेले असता गायराना शेजारी जमीन असलेले शेतकरी केशव बापू राऊत याने त्याच्या शेतातील मोठे दगड व गोटे हे गायरान जमिनीत टाकून सोपान खाडे याना जमीन कसण्यास विरोध केला. या बाबत सोपान खाडे यांनी केशव राऊत याना विचारले असता त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाचे निवेदन सोपान खाडे यांनी पोलीस निरीक्षक केज यांना दिले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी, केज यांना देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

No comments