Breaking News

किराणा दुकानात गुटखा विक्री; दुकानदारावर गुन्हा दाखल

केज :  केज येथील एका किराणा दुकांनातुन गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याच्या माहिती वरून दुकानातून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाने दुकानदार विरुद्ध पोलीस कार्यवाही केली आहे.

अधिक माहिती अशी की, दि. २२ मे रोजी केज येथील हनुमान गल्लीतील शिवशंकर नावाच्या किरणातून गुटखा आणि तांबाखुजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या नुसार पोलिसानी कार्यवाही करून सदर दुकानातून बाबाजी पान मसाला, गुलाम गुटखा, राजनिवास पान मसाला, तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ आता एकूण ३६७५ रु. चा मुद्धेमाल जप्त केला होता. या प्रकरणी आज दि. १ जून रोजी अन्न व औषश प्रशासन विभागाचे बीड विभागाचे सहाय्यक आयुक्त ऋषिकेश मरेवार यांच्या फिर्यादी नुसार विजय बबन सोनवणे यांच्या विरोधात केज पोलीस स्टेशनला गु. र. नं. /२०२० भा. दं. वि. ३७२.२७३ सह अन्न व सुरक्षा मानद कायदा २००६ नियम व नियमन २०११ चे कलम३६,३७,३०व५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर हे पुढील तपास करीत आहेत.

No comments