Breaking News

बांध नांगरण्यावरून कुऱ्हाडीने मारहाण : परस्पर विरोधात गुन्हे दाखल

बांध नांगरणाऱ्या ट्रॅक्टरवर आता काय कार्यवाही होणार?
 सदर भांडणात ट्रॅक्टर क्र एमएच-४२/एफ-१४०३ शेतनांगरणी करीत असतानाचे फोटो शेतकऱ्यांनी काढला असून जिल्हाधिकारी यांनी बांध नांगरणाऱ्या ट्रॅक्टरवर गुन्हा डाखल करण्याचे आदेश दिले असल्याने आता त्यावर काय कार्यवाही होणार आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गौतम बचुटे । केज
केज तालुक्यातील कोडेवाडी येथे शेत नांगरणी करीत असताना बांध नांगरल्याच्या कारणावरून दोन शेतकऱ्यांत भांडण होऊन एकास कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली असून एकमेकां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, केज कोरडेवाडी येथे गोविंद शिवगीर गिरी  यांच्या शेजारी जालिंदर गिरी यांची जमीन आहे. आज दि. २१ जून रोजी दुपारी २:०० वा.जालिंदर गणेश गिरी, संजय जालिंदर गिरी, समाधान उर्फ राजू गिरी हे ट्रॅक्टर क्र एमएच-४२/एफ-१४०३ या ट्रॅक्टरने त्यांनी सार्वजनिक बांध नांगरला त्यावेळी गोविंद गिरी हे त्यांना बांध नांगरु नका म्हणाले असता वरील तिघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली तसेच जालिंदर गिरी यांनी हातातील कुऱ्हाड डाव्या डोळ्याच्या वर मारून जखमी केले. आणि हातातील दगड मारून जखमी केले. तसेच त्यांचा नातू प्रभुराम अशोक गिरी यालाही जखमी केले. या प्रकरणी गोविंद शिवगीर गिरी यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस स्टेशनला जालिंदर गिरी, संजय गिरी, समाधान उर्फ राजू गिरी आणि दैवशाला गिरी या चौघां विरुद्ध गु. र. नं. २२९/२०२० भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल बालकृष्ण मुंडे हे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान जालिंदर गिरी यांनीही गोविंद गिरी, कृष्णा गिरी, भागवत गिरी आणि अशोक गिरी या चौघांनी कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून डोके फोडले अशी तक्रार दिली असून या चौघां विरुद्ध गु. र. नं. २३०/२०२० भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल श्रीराम चेवले हे पुढील तपास करीत आहेत.

No comments