Breaking News

गोपीचंद पडळकर म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार- कल्याण आखाडे

बीड ( प्रतिनिधी ) देशाचे जुने - जाणते व प्रचंड अनुभवी नेतृत्व तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्याबद्दल आ. पडळकर यांनी केलेले विधान अत्यंत बेताल, बालिश, बेजबाबदारपणाचे तसेच निंदनीय व संतापजनक असून गोपीचंद पडळकर म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार यातला प्रकार असल्याची प्रतिक्रिया सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी व्यक्त केली आहे.

पुढे बोलताना श्री आखाडे म्हणाले की, समजा जर वाचाळ लोकांची युनियन काढून जो सर्वात जास्त वाचाळ त्याला युनियनचे अध्यक्ष करायचे ठरले तर हे पद गोपीचंद पडळकर यांनाच निश्चित मिळेल कारण आज मित्तीला त्यांच्या सारखा वाचाळवीर शोधून सापडणार नाही. खा. शरदचंद्र पवार यांच्यासारख्या नेतृत्वाबद्दल बोलताना कोणीही एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर शंभरदा विचार करावा एवढे ते उत्तुंग व कर्तबगार नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी वक्तव्य किंवा टीका करताना आ. पडळकरांनी जाण आणि भान राखायला पाहिजे होते. परंतु, सतत मोठमोठ्या व्यक्तिमत्वांना टार्गेट करायचे, बेछूट आरोप करायचे व प्रसिद्धीच्या झोतात राहायचे हा एक चुकीचा छ्दं त्यांना जरा जास्तीचाच जडलेला दिसतोय. मात्र अशा वाचळवीरांना जनता चांगलीच ओळखून असते हे कोणीच विसरता कामा नये. गोपचंद पडळकर तसा अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला गडी! समाज बांधवासोबत दिशाभूल व धोकाधडी करून आमदारकी पटकावताच लगेच त्यांना बहुजनांचा नेता बनण्याची स्वप्न पडू लागलीत. पण त्यांचे हे स्वप्न कदापी पूर्ण होऊ शकणार नाही कारण महाजनांच्या ( मनुवादी विचारसरणी ) पक्षात राहून बहुजनांचा नेता होता येणार नाही हे पडळकरांनी लक्षात घ्यावे असेही आखाडे यांनी म्हटले आहे.

1 comment: