Breaking News

मामाच्या मुलीवर भाच्याची जबरदस्ती

मामाच्या मुलीवर जबरदस्ती
अंबाजोगाईतील क्रूर प्रकार;नातेवाईकांनी केला घटना दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न, पिडीत मुलीच्या आईच्या सतर्कतेमुळे घटनेला फुटली वाचा
अंबाजोगाई  पोलीस ठाण्यात नराधम भाच्या विरोधात गुन्हा दाखल
गौतम बचुटे ।  केज 
अंबाजोगाई येथील बोधीघाट येथे एका आठ वर्षाच्या चिमुकलीवर तिच्या सख्ख्या आत्याच्या मुलाने बलात्कार केला असून हा प्रकार तिच्या नातेवाईकांनी दडपण्याचा प्रकार केला. परंतु डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे आणि पिडीत मुलीच्या आईमुळे या प्रकरणाला वाचा फुटली. पती पासून विभक्त माहेरी राहणाऱ्या पीडित मुलीच्या आईच्या तक्रारी वरून त्या नराधमा विरोधात गुन्हा दाखल आला आहे.


या बाबतची माहिती अशी की, अंबाजोगाई शहरातील बोधी घाट या उपनगरातील भागात एका नराधमाने आपल्या मामाच्या आठ वर्षे वयाच्या मुलीवर दि. १९ जून रोजी दुपारी घरी कोणी नसताना त्याच्या सख्ख्या मामाच्या आठ वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार केला. या बाबत कुणाला सांगू नको म्हणून मारण्याची धमकी दिली त्या नंतर मुलीच्या  गुप्तांगाला इजा झाली तीने हा प्रकार आज्जीला सांगितला. या बाबत कुटुंबा पासून विभक्त व आपल्या माहेरी राहणाऱ्या पिडीत मुलीच्या आईला हा प्रकार न कळविता पिडीत मुलीला परस्पर अंबाजोगाई येथील स्वा. रा. ति. येथील सरकारी दवाखान्यातील वार्ड क्र. ६ (ब) मध्ये भरती करून उपचार सुरू आणि डॉक्टरला खोटी माहिती दिली. परंतु उपचार करणाऱ्या डॉक्टरांना या बाबत संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. परंतु तरीही पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पोलीसांना खरी महिती दिली नाही. हा गंभीर प्रकार दडपण्याचा प्रकार चालविला होता. त्या नंतर दि. २४ जून रोजी पिडीत मुलीच्या आईला शेजारी राहणारे लोक व पिडीत मुलीच्या लहान बहिणीकडून महिती समजल्या नंतर तिने दवाखान्यात जाऊन पीडीत मुलीला विश्वासात घेऊन विचारल्या नंतर तिने खरी माहिती दिली. त्या प्रमाणे आठ वर्षीय पिडीत बालिकेच्या आईने अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला दक्षता समिती सदस्या अँड. सुनीता देशपांडे यांच्या समक्ष दिलेल्या लेखी फिर्यादी नुसार त्या नाराधमच्या विरोधात गु. र. नं. २४१/२०२० भा. दं. वि. ३७६, ३७६ (२) (१), ५०६ आणि बाललैंगिक अन्यायत्याचार कायदा २०१२ कलम ४, ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सुचिता शिंगाडे या करीत आहेत.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात ! :- या गंभीर प्रकरणी पोलिसांनी तपासची चक्रे गतीने फिरवून आरोपी फरार होण्या पूर्वीच त्याला झडप घालून काही तासातच ताब्यात घेतले.

तो नराधम अल्पवयीन :- या घटनेतील आरोपी हा अल्पवयीन आहे की काय याची पडताळणी आरोपीच्या उपलब्ध कागद-पत्रा आधारे होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गाडे आणि तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुचिता शिंगाडे मॅडम यांनी दिली.
-------------------------------------

No comments