Breaking News

केजमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या


गौतम बचुटे । केज
नापिकी आणि पत्नीच्या आजारपणातील कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केजमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, केज येथील भगवान साधू गवळी यांनी शेतातील नापिकी आणि पत्नीच्या आजारपणातील उपचारासाठी लोकांचे घेतलेले हात ऊसने पैसे याच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून दि.५ जून रोजी केज शिवारातील मोळपट्टी नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयताचा मुलगा गणेश भगवान गवळी यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला फौजदारी संहिता १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यू अ. क्र. २६/२०२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल मंगेश भोले हे पुढील तपास करीत आहे. 

No comments