Breaking News

कार्यकारी अभियंता व्ही. व्ही. जाधव यांचा सपत्नीक सत्कार


भगवान साकसमुद्रे । परळी
 येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंता व्ही. व्ही. जाधव  नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने फुले - शाहू - आंबेडकरी अभ्यासक संघटनेच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

व्ही. व्ही. जाधव  हे गेली  32  वर्षे महाजनको  मध्ये कार्यरत होते . सुट्टीच्या दिवशीही  सामाजिक जाण ठेऊन फुले  शाहू आंबेडकर विचार  धारेचा  प्रचार  आणि प्रसार तसेच समाज सेवा करण्याचे  महत्वाचे काम त्यांनी केले.
सेवानिवृत्त  झाल्यानंतर त्यांचा तसेच त्यांच्या पत्नी अनुराधा जाधव यांचा सत्कार फुले - शाहू - आंबेडकरीअभ्यासक भगवान साकसमुद्रे, शिक्षक लक्ष्मण वैराळ, म. फुले  विद्यालयाचे  विनोद  उंबरे,स्वप्नील गिरी,  संभाजी  ब्रिगेडचे दादासाहेब  डिकले आदिनी केला व  पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

No comments