Breaking News

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याचे काम निकृष्ट

रिपाइं ची तहसीलदारकडे तक्रार

गौतम बचुटे । केज
 केज तालुक्यातील तांबवा येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता अधिकारी आणि गुत्तेदार यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार रिपाइंच्या वतीने  करण्यात आली आहे.

    या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील मौजे तांबवा येथे महामार्ग ते तांबवा येथील तांबवेश्वर मंदिर या सुमारे दीड किमी अंतरातील रस्ता काम हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून काम सुरू आहे. परंतु सदरील काम हे संबंधित गुत्तेदार आणि यावर देखरेख करणारी सरकारी यंत्रणा यांचे अधीकारी आणि अभियंता हे संगनमत करून या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य याचा वापर करीत आहेत. तसेच योग्य आकाराचे आणि योग्य प्रमाणात खडी व मुरूम टाकून त्याची दबई केली गेलेली नाही. तसेच डांबरीकरण करताना डांबराचे योग्य प्रमाण आणि त्याच्या थराची योग्य प्रमाण नसल्याचे दिसून येते. या कामावरील संबंधित अधिकारी हे दखल घेत नसून शासनाची व जनतेची फसवणूक होत आहे.या प्रकरणी दि.२५ रोजी तरी मे साहेबांनी याची दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून गुत्तेदार यांचे लायसन्स रद्द करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी. अशी मागणी रिपाइंच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, केज तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

No comments