Breaking News

लॉकडाऊनच्या कालावधीत ३१ जुलै पर्यंत वाढ


 मनाई व जमावबंदी आदेश कायम- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ३१ जुलै २०२० रोजी पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला असून  त्यानुसार जिल्हयात दिनांक ३१ जुलै २०२० रोजी रात्री १२.०० वा. पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) अन्वये मनाई व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे आज जे आदेश लागू आहेत ते आदेश दिनांक ३१ जुलै २०२० पर्यंत कायम राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
 यापूर्वी आदेशानुसार जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४ (१) (३) अन्वये दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले होते त्या कालावधीत ३१ जुलै २०२० पर्यत वाढ झाली आहे.
राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा  1897 खंड 2 , 3 व 4 नुसार  13 मार्च 2020 पासून प्रतिबंध लागू केले आहेत. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.

No comments