Breaking News

लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करा अन्यथा कार्यवाही- तहसीलदार मेंढके


गौतम बचुटे । केज
केज शहरात व्यापारी आणि ग्राहकाकडून लॉक डॉउनच्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येताच तहसीलदार व मुख्याधिकारी रस्त्यावर उतरून कार्यवाही करताच व्यापारी आणि ग्राहकांनी धसका घेतला.

लॉक डाउन ५.० मध्ये व्यापारी आणि ग्राहकाकडून सोशल सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नसून फळविक्रेते आणि हातगाडी वाल्याकडून बेकायदेशीर कॅरिबॅग वापर होत असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी होत असल्याने दि.१ जून रोजी तहसीलदार दुलाजी मेंढके  आणि मुख्याधिकारी भोसले यांनीअचानक रस्त्यावर उतरून कार्यवाही सुरू करताच अनेकांची पळापळ झाली. तर मुख्याधिकारी यांनी काही व्यापाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही देखील केली. यावेळी पोलीस कर्मचारी बाळासाहेब अहंकारे, नगर परिषदेचे कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान सोबत होते.

No comments