Breaking News

करोनावर इंजेक्शन आहे मात्र ते आपल्याला परवडणारं नाही : शरद पवार

साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळ बैठक व पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आज या बैठकीला उप मुख्यमंत्री अजित पवार ही उपस्थित होते.

इथली माध्यमं जास्त जागरूक आहेत. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांना जास्त भीती होती इथला करोना बाहेर गेला अशा शब्दांत शरद पवार यांनी माध्यमांनाही टोला लगावला. मुंबई-पुण्यातून बाहेर गेलेले लोक पुन्हा येऊ लागले आहेत. त्यामुळे करोना रुग्ण आणखी वाढण्याची भीती शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.करोना विषाणूनं संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आणखी मोठी भर पडणार आहे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान करोना व्हायरसवर इंजेक्शन आहे मात्र ते आपल्याला परवडणारं नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
“आता आपल्याला करोनासोबतच जगावं लागणार आहे. आत्मविश्वासाने उभं राहणं, स्वतःची काळजी घेणं हाच पर्याय आहे. करोनावर इंजेक्शन निघालं आहे पण ते आपल्याला परवडणारं नाही. आपल्या देशात ते मिळत नाही. ३० ते ३५ हजार रुपये आपल्या माणसाला परवडणारं नाही. मुंबई पुण्यातून बाहेर गेलेले लोक पुन्हा येऊ लागले आहेत. त्यामुळे करोना रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होते आहे.”

No comments