Breaking News

दुचाकीस्वारास चौघांनी बदाडले

गौतम बचुटे । केज
रस्त्याने मोटार सायकल जोरात का पळविली म्हणून केज तालुक्यातील हादगाव डोका येथे तेवीस वर्षीय महाविद्यालयीन युवकाला चौघांनी मारहाण केली आहे.

दि. २६ जून रोजी ११:०० वा च्या सुमारास महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवकास तो बैलगाडीने शेतात जात असताना गावातील श्रीराम गोपाळ वायबसे, हरिशचंद्र गोपाळ वायबसे, संतोष हरीशचंद्र वायबसे, सुमित
हरिश्चंद्र वायबसे हे त्यांचे घरासमोर उभे होते. सचिन वायबसे यास श्रीराम गोपाळ वायबसे याने हाक मारुन थांबवुन मोटार सायकल दमाने चालवित जा. असे म्हणताच जवळ येवुन गालात चापटाने मारहाण केली. तसेच हरिश्चंद्र गोपाळ वायबसे, संतोष हरिश्चंद्र वायबसे,
सुमित हरिश्चंद्र वायबसे यांनी पण त्याला लाथा-बुक्याने मारहाण करुन शिवीगाळ केली. पुन्ह्हा् जर मोटार सायकलवरून पुन्हा ईकडेआलास तर जिवेस मारुन टाकिन अशी धमकी दिली. या प्रकरणी सचिन वायबसे यांनी केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अदखलपात्र गु. र. नं.  ५१४/२०२० भा. दं. वि. ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा नोंद करून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल गायकवाड हे तपास करीत आहेत.

No comments