Breaking News

गावठाण हद्दवाढीसाठी दान केलेल्या जमीनी वरील अतिक्रमण हटवा; रिपाइंचे दिपक कांबळे यांची तहसीलदारांकडे मागणी


गौतम बचुटे । केज
गावठाण हद्दवाढीसाठी दान दिलेल्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांनी तहसीलदार मेंढके यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे सन१९८३ साली हरिभाऊ लाड यांनी आपल्या मालकी हक्कातील सर्व्हे नंबर १०५ मधील २:०० एकर जमीन गावच्या वस्तीवाढ आणि गावठाण हद्दीसाठी दान दिली आहे. त्या संबंधी सर्व महसुली दस्तऐवजला त्याची रितसर नोंद आहे. मात्र हरिभाऊ लाड यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी त्या दान दिलेल्या जमीनीवर अतिक्रमण केले आहे. त्या ठिकाणी ज्या लोकांचा भूखंड आहे. त्यांनी दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याची माहिती मिळताच केज तालुका रिपाइंचे अध्यक्ष दिपक कांबळे यांनी रिपाइंच्या शिष्टमंडळासह तहसीलदार दुलाजी मेंढके यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्या प्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यांच्या सोबत शिष्टमंडळात सरचिटणीस गौतम बचुटे, उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, त्रिंबक शिंदे, राहुल शिंदे हे होते. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती दिपक कांबळे यांनी दिपक कांबळे यांनी दिली.

No comments