महाराष्ट्रात शाळा सुरू होणार नाहीत; पण अभ्यासक्रम होणार सुरू
मुंबई : महाराष्ट्रात यापूर्वी १५ जून पासून शाळा सुरू करण्यावर विचार सुरू होता. परंतु आता शाळा सुरू करण्याऐवजी केवळ अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. दरम्यान, जुलै महिन्यापासून वर्ग सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात १५ जून आणि २६ जून रोजी (विदर्भ क्षेत्रासाठी) तसंच ग्रीन झोनमध्येही शाळा सुरू होणार नसल्याची माहिती शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्यानं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.
गेल्या रविवारी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीनं शाळा जून महिन्यापासून सुरू होणार असल्याचं म्हटलं होतं. तसंच राज्यातील ऑनलाइन शिक्षण पद्धतीवरही भर देण्याची गरज असल्याचं मंत्र्यांनीदेखील सांगितलं होतं. “सध्या गुगल क्लासरूम वापरली जाऊ शकते. तसंच येत्या काळात स्वतंत्र संगणक आधारित प्रणाली विकसित केली जावी,” असंही ते म्हणाले.

No comments