Breaking News

ड्रायव्हरसह आईला मारहाण

पोलिसात परस्परविरोधात तक्रार दाखल
गौतम बचुटे। केज
माझ्या घरा समोरून वेगाने ट्रॅक्टर का नेले ? असं म्हणत ट्रॅक्टर ड्राइव्हरला मारहाण केली तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या आईच्या डोक्यात दगड मारून जखमी घटना केल्याची साळेगाव (ता. केज) येथे घटना घडली. याप्रकरणी पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि.५ जून रोजी दुपारी २:०० वा साळेगाव ता. केज येथे बाळू बाबुराव देवकते रा. चिंचखडी ता. अंबाजोगाई ह. मु. गित्ते वस्ती साळेगाव हा ट्रॅक्टर मालक रामदास गित्ते यांच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करीत आहे. बाळू देवकते हा दुपारी ट्रॅक्टर मालकाच्या घरा समोर ट्रॅक्टर उभे करण्यासाठी घेऊन जात असताना बाळू गिते व त्यांची पत्नी हे बाळू देवकते यांना म्हणाले की, तू आमच्या घरा समोरून ट्रॅक्टर वेगात का चालवितो म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. त्यावेळी बाळू देवकते याचे वडील व आई हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असता बाळू गिते यांनी त्यांच्या हातातील दगड बाळू देवकतेच्या आईच्या उजव्या डोळ्याच्या भूवई जवळ मारून जखमी केले आणि जिवे माारण्याची धमकी दिली. देवकते कुटुंब हे मागास प्रवर्गातील होलार जातीचे असून ते मोलमजुरी करण्यासाठी साळेगाव येथे गिते वस्ती शेजारी रहात आहेत. ही सर्व माहिती मारहाण करणाऱ्यास माहिती असूनही देवकते याना मारहाण करण्यात आली.
बाळू देवकतेच्या फिर्यादी नुसार केज पोलीस स्टेशनला बाळू गित्ते आणि इतर दोघा विरोधात केज पोलीस स्टेशनला गु. र. नं. २१३/२०२० भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच गवळण गित्ते यांच्या फिर्यादी नुसार बाळू देवकते आणि इतर दोघा विरोधातही परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर भा. दं. वि. ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.


No comments