Breaking News

विद्युत शॉक लागून तरुणाचा मृत्यू

केज : शेजारील घराच्या छतावर साचलेल्या पावसाचे पाणी काढत असताना अठरा वर्षीय तरुणाचा घरावरुन गेलेल्या विद्युत वाहक तारेला स्पर्श झाल्याने त्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना केज शहरातील बारभाई गल्लीत बुधवारी सायंकाळी 5. 30 वाजण्याच्या सुमारास घडली.


मिळालेल्या माहितीनुसार बोरवटी ता. कळंब जि. उस्मानाबाद येथील अभिषेक लहू काळे ( वय १८) हा तरुण केज येथील आपल्या मामच्या घरी बारभाई गल्लीत राहत होता. बुधवारी सायंकाळी 5. 30 वाजण्याच्या सुमारास अभिषेक शेजारच्या घरावर पावसाचे साचलेले पाणी काढण्यासाठी छतावर गेला होता. दरम्यान सुसाट्याचा वारा सुटल्याने घरावरून गेलेल्या
विद्युत तारेला त्याचा स्पर्श झाल्याने शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. लोंबकळणार्या विद्युत तारा संबंधी वारंवार महावितरणला कळवून ही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अभिषेकला हकनाक आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे महावितरण विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

No comments