Breaking News

पोलिसांनी स्व: खर्चातून केला रस्ता मात्र बाथरूमचं पाणी टपकू लागलं


केजची पोलीस कॉलनी समस्यांच्या विळख्यात; कर्मचाऱ्यांसह कुटूंबीय त्रस्त
गौतम बचुटे । केज
केज पोलिसांनी स्वखर्चाने वर्गणी करून पोलीस वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करून घेतला आहे. मात्र अनेक पोलीस निवास स्थानात बाथरूमचे पाणी टपकत आहे. यामुळे घरात राहायचं कस असा प्रश्न निर्माण झाला असून वसाहती मधील अनेक घरे जीर्ण झाल्यानं पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटूंबीय यामुळे त्रस्त झाले आहेत.

 केज येथील पोलीस कर्मचारी हे मागील एक महिन्या पूर्वी नवीन पोलीस वसाहतीच्या इमारतीती राहण्यासाठी गेले आहेत. मात्र या वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल होत होता. सरकारी योजनेत हा रस्ता मंजूर असतानाही काम लवकर होत नसल्याने येथील रहिवाशी कर्मचाऱ्यांना रस्त्याने वागता येत नव्हते. तसेच वाहने व दुचाकी घसरत होत्या. म्हणूज सर्व कर्मचाऱ्यांनी वर्गणी करून रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करून घेतला आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांची गृह दशा संपेना !  
 पूर्वीची पोलीस वसाहतीतील निवासस्थाने जीर्ण झाली होती परंतु आता जरी केज पोलीसांना नवीन निवासस्थाने मिळाली असली तरी अनेक निवासस्थानात वरच्या निवास स्थानातील बाथरूमचे पाणी टिपकत आहे. त्यामुळे केज पोलीसांची गृहदशा कायम आहे.

निवास स्थानांची दुरुस्ती करू - उपअभियंता कांबळे
सार्वजनिक बांधकाम विभाग केजचे उपभियंता कांबळे  संपर्क साधला असता त्यांनी लवकर दुरुस्ती केली जाईल असे प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

No comments