Breaking News

छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

बीड : येथील मुप्टा संघटनेच्या वतीने सम्यक संकल्प फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महापुरुषांची जयंती व स्मृतिदिन साजरा केला जातो. २६ जूनला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय डिजिटल फेसबुक लाईव्ह वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संयोजन समिती दिली आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा जागर व्हावा व त्यांच्या समतामूलक विचारांची विद्यार्थ्यांना ओळख होऊन त्यांनी तो विचार कृतीत उतरावा या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
    १) समता सेनानी राजर्षी शाहू महाराज, २) राजर्षी शाहू महाराजांची मानवतावादी भूमिका, ३) आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, वरील तीनही स्पर्धेचे विषय असून स्पर्धेसाठी रोख २५०००  रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहे. प्रथम पारितोषिक ५०००  रुपये (सिद्धार्थ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, जाफराबाद) द्वितीय पारितोषिक ३००० रुपये (तुलसी  इंग्लिश स्कूल व तुलसी ज्युनिअर कॉलेज, बीड) तृतीय पारितोषिक २०००  रुपये (चाटे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, केज) यांच्या तर्फे दिले जाणार असून कालकथित- हिरकणी सोपानराव शिनगारे यांच्या स्मरणार्थ ५ (पाच) उत्तेजनार्थ प्रत्येकी १००० रुपये देण्यात येणार तर कालकथित- जनाबाई हरिभाऊ कांबळे, शिवराम होणाची मस्के, भिकूलाला मगर, मारुती रागोबा रोडे, नारायण संभाजी गायकवाड, यांच्या स्मरणार्थ प्रत्येकी १( एक)रोख १०००  रुपये उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रा. डॉ. श्यामसुंदर वाघमारे ,परभणी, फिनिक्स इंटरनेशनल स्कूल, आष्टी, संस्कृती महाविद्यालय पूर्णा, जिल्हा परभणी यांच्या वतीने प्रत्येकी १(एक) रोख रक्कम १०००  रुपये दिले जाणार आहेत.
    स्पर्धेतील विद्यार्थ्याने मराठी ,हिंदी, इंग्रजी या भाषेतील कोणत्याही विषयावर ५  ते ७  मिनिटाचा व्हिडीओ तयार करून सम्यक संकल्प फेसबुक  पेजवर पाठवावा व सोबत ऑनलाईन फॉर्म दिलेला आहे, तो भरून सबमिट करावा नंतरच प्रवेश गृहीत धरला जाईल. करिता अधिक माहितीसाठी संपर्क प्रा. कोरडे अंकुश- 9860908922  प्रा. वाघमारे किशोर-8888576640 प्रा.पांचाळ बबन - 7020306687
    तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून महापुरुषांची विचारधारा जागृत ठेवावी असे आवाहन बीड जिल्हा मुप्टाचे जिल्हाध्यक्ष मा. प्रा. प्रदीप रोडे व पदाधिकारी ,सदस्य यांनी केले आहे.

No comments