Breaking News

केजमध्ये युवकाचा खदानीत बुडून मृत्यू

 गौतम बचुटे । केज
 केज येथील बजरंग नगरच्या वडार वस्तीतीच्या पाठीमागील असलेल्या खदाणीत पाय घसरून एक युवक पडल्याचे काही मुलांनी शनिवारी (दि. २७) सकाळी पाहिले. तत्काळ याची माहिती मुलांनी परिसरातील लोकांना दिली. दरम्यान पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. पाण्यात बुडालेल्या युवकाला शोधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. अखेर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आठरा वर्षीय युवकाचा मृतदेह पाण्यात सापडला.

अंबाजोगाई येथील चंद्रकांत हनुमंत इटकर वय 18 वर्ष हा केज येथील त्याचे चुलते इटकर हे बीड रोड लगतच्या बजरंग नगर वडार वस्ती केज यांच्याकडे आला होता. तो दि. २७ जून रोजी वस्तीच्या मागे असलेल्या खदानीकडे गेला होता. त्यावेळी अनावधानाने तो खदाणीत पडला. ही घटना लहान मुलांनी पाहिली व वस्तीवर माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशा नुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर व मंगेश भोले हे घटना स्थळी हजर झाले. खदानीत भरपूर पाणी असल्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून पाणी काढून देण्याचाही प्रयत्न केला. परंतु पाणी भरपूर असल्यामुळे प्रेत सापडत नव्हते. म्हणून पोलिसांनी प्रेताचा शोध घेण्यासाठी स्थानिक पाणबुडे आणि अग्निशमन दल व नगर पंचायतीचे कर्मचारी यांच्या मदतीने मृतदेह शोध सुरू ठेवला. अखेर शेवटी १:३० वा. च्या दरम्यान मृतदेह हाती लागला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे.

No comments