Breaking News

क्षयरोग कंत्राटी कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन


बीडची क्षयरोग आरोग्य सेवा विस्कळीत
 सेवेत कायम करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
बीड : आरोग्य विभागातील क्षयरोग कंत्राटी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या, या मागणीसाठी राज्यभरातील क्षयरोग कंत्राटी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारले असून बीड येथील या आंदोलनात जिल्यातील क्षयरोग कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे क्षयरोग विभागातील जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.

कोरोना विषाणुने बीड जिल्ह्यातही थैमान घातले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 116 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून, पावसाळा तोंडावर असल्याने हिवताप मलेरियासारख्या साथीचे रोगांमुळे आरोग्य विभाग सज्ज असायला पाहिजे. मात्र, आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने आरोग्य खात्याला मोठा झटका बसला आहे. आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी मागील पंधरा वर्षावासून तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. या विभागात बर्‍याच जागा रिक्त आहेत. शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त जागांवर कंत्राटींना कायम करावे, अशी मागणी मागील दहा ते पंधरा  वर्षापासून केली जात आहे. पण, कंत्राटींच्या माथी आश्वासनापलिकडे काहीच पडले नाही. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण आणि कंत्राटी कर्मचार्‍यांनी दिला आहे.
 यासंदर्भातील निवेदन डाॅ पवार आर बी  जिल्हा आरोग्य अधिकारी यांना किशोर चव्हाण बीड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम कर्मचारी संघटना, मार्गदर्शक बहिर शिवाजी, प्रमोद भोसले, उपाध्यक्ष सलीम पठाण, सचिव सचिन जडे, कोषाध्यक्ष जयशंकर चौरे,  संघटक विजय कारगुडे, आसाराम वाघमारे, प्रसिद्धी प्रमुख वैजिनाथ खंडागळे
सदस्य कुटे राजेश, पालिमकर नरेंद्र, मंगेश खरात, लक्ष्मण चव्हाण, शॆलेश बर्दापुरकर, देशपांडे शैलेश, दीपक पाटील, राहुल देशमुख, बाबासाहेब पव्हणे, राजेश भोसले, राजाभाऊ जाधव, राजेश चाटे, श्रीमती बनसोडे, श्रीमती शिंदे, विजय लांडगे, खाकरे संतोष, यांच्यासह आदींना दिले आहे.

No comments