Breaking News

मंदिरातील तीन साधूंनी महिलेवर केला ७ वेळा बलात्कार

राजकोट  -  गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील तीन साधूंनी एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. आरोपी साधूंनी ७ वेळा बलात्कार
 केल्याचे या पीडित महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

 पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर या तिन्ही साधूंना अमरेली पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणाची दम नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर या साधूंना बेड्या ठोकण्यात आल्या.
या महिलेने मजुरीच्या नावाखाली साधूंनी गेले १८ महिने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या महिलेची वैद्यकीय तपासणी केली असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. पोलीस सध्या या साधूंनी आणखी इतर महिलांवर अशा प्रकारे लैंगिक अत्याचार केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. रघुराम भंगार, जगदीश भागात आणि भावेश भागात अशा अटक केलेल्या साधूंची नावे आहेत.
राजस्थानमध्ये घडली होती अशी घटना
त्याचप्रमाणे, अलीकडे राजस्थानच्या करौली जिल्ह्यात एका गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याच्या घटनेत एका जैन साधूला अटक करण्यात आली होती.या साधूकडून पोलिसांनी कंडोम पॅकेट्स, ३३ पेन ड्राईव्ह आणि दोन लॅपटॉप हस्तगत केले आहेत. हस्तगत केलेल्या वस्तू पोलिसांना आरोपी राहत असलेल्या आश्रय निवासात एका मोठ्या बॅगमध्ये सापडल्या. या बॅगमध्ये तब्बल १९ मोबाइल फोन, २ लॅपटॉप, ४ हार्ड डिस्क, कंडोम पॅकेट्स आणि ३३ पेन ड्राईव्ह होत्या. दरम्यान, पोलिसांनी मिळालेली हार्ड डिस्क स्कॅन केल्यानंतर यात त्यांना अश्लील व्हिडीओ आढळून आले.
No comments