Breaking News

आरणगावमध्ये गळीत धान्य सोयाबीन लागवड शेतीशाळा संपन्न

गौतम बचुटे। केज :
नानाजी देशमुख कृषि संजीवणी प्रकल्पा अंतर्गत केज तालुक्यातील आरणगाव येथे सोयाबीन लागवड या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेती शाळा आयोजित करण्यात आली होती.

केज तालुक्यातील आरणगाव आणि या परिसरात सोयाबीन हे गळीत पीक मोठ्या प्रमाणात लागवड सुरू आहे. सोयाबीन लागवड व उत्पादन हे कमी व अल्पप मुदतीचे पिके शेतकऱ्यांना नगदी पैसे मिळवून देणारे पीके आहेत. आरणगाव येथे समूह सहाय्यक कमलाकर राऊत यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेती शाळा आयोजित केली होती. यात सोयाबीन लागवडी वेळी पेरणीपूर्व बीज प्रक्रिया घ्यावीत. तसेच कीड व पाणी व्यवस्थापन आणि खतांची योग्य प्रमाणात मात्रा या विषयी  माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच मधुकर सिरसट, कृषी सहाय्यक नितीन पाटील, कृषिमित्र अमोल राउत, शामसुंदर सिरसट, आशू पोपळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
"शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करून माती परीक्षण करून घेणे आवश्यक असल्याचे माती परीक्षण तज्ञ कमलाकर राऊत म्हणाले.

No comments