Breaking News

विटाळ : भारत- इंडिया..!

देशाला भारत- इंडिया म्हटल तर आपल्या जिभेला विटाळ होईल;  या विकृत मानसिकतेच प्रदर्शन करणारी काही मूठभर टोळकी,आपल्या सोयी आणि स्वार्थासाठी देशाला हिंदुस्तान बनविण्याच्या कृलुपत्या आखत आहेत. देशातील मुस्लिम, जेन, ख्रिश्चन, बौद्ध, आदिवासी यांच्यात असुरक्षित असल्याची भावना निर्माण करीत देशाची एकता व अखंडतेला खिंडार पाडू पाहत आहेत की काय असा सवाल भारतीयांमधून उपस्थित केला जात आहे.


।। यदा -यदा ही धर्मस्य ग्लानीरभवती भारत:।।

भगवत गीतेतील हा शोल्क दस्तुरखुद्द भगवान श्रीकृष्णाने म्हटला आहे. याचा अर्थ असा की, जेंव्हा- जेंव्हा संकट येईल, त्या- त्यावेळी मी भारत भूमीवर जन्म घेईल. हे कृष्णभक्तांना कदाचित चांगलेच ठाऊक आहे. परंतू दरवर्षी गावा-गावात भागवत कथेचे आयोजन करून ती, ऐकवली आणि ऐकली जाते. भक्त ही तल्लीन होऊन ती ऐकतात. मग आज लॉकडाऊनमध्ये भारतीय नागरिक कोरोनाने भयभीत झाले असतांना भविष्य आणि रोजी- रोटीच्या विचाराने चिंताग्रस्त झाले असतांना, अशात शोल्काचा अर्थ सांगणं का गरजेचं आहे, ही उठाठेव का? सहाजिकच हा प्रश्न वाचकांना पडल्या वाचून राहणार नाही. आज मंगळवार दि. २ जून २०२०  एका महत्वपूर्ण याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणार आहे. मात्र त्या याचिकेचा व त्यावरील निर्णयाचा देशाशी आणि नागरिकांशी काय संबंध? या देशाच नाव हिंदुस्तान असावं यासाठी, एका व्यक्तीने आपलं पूर्ण नाव न देता
ती याचीका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात आज निर्णय होणार असून त्याचा देशावर आणि येथील १३० कोटी जनतेवर काय परिणाम होणार आहे? देशाचं येथील विविध जाती, धर्म- पंथ आणि नागरिकांच भवितव्य ठरवणारा हा निर्णय असणार आहे. त्यामुळे याकडं सजग बुद्धीवादी भारतीयांचं लक्ष वेधल गेलं आहे. आशा आणि-बाणीच्या संकटात का?  कशासाठी? याचिका दाखल केली आहे. न्यायालय काय भूमिका घेणार याकडं तमाम भारतीयांचे डोळे लागलेत.

विविध जाती, धर्म, पंथ आणि परंपरेने नटलेला सुजलाम- सुफलाम भारत विविधतेत एकता असलेला देश आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून काही मूठभर लोक याला हिंदुस्थान  बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. तशी धडपड कैक वर्षांपासून सुरू आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानामुळे ते आजवर सफल होऊ शकले  नाही, असचं दिसतं. जर धर्म-पंथ यावरून देशाचं नावं पडले असते तर देशाचे अगणित तुकडे पडून पुन्हा हा देश आणि येथील जनता गुलामीच्या बेडीत अडकून पडल्या वाचून राहणार नाही. असा अंदाज त्यावेळी घटनानिर्मात्यांना आला असावा. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात कोणत्याही शब्दाच भाषांतर केलेलं नाही.  India that is bharat या इंग्रजी शब्दचं भाषांतर करून इंडिया म्हणजे भारत असं स्पष्ट नमूद केलं. यामुळे या देशाच दुसरं- तिसरं कोणतंही नाव नसून भारत किंवा इंडिया हेच निर्विवाद स्पष्ट केलं.

आजवर अनेक चित्रपटाचं नामकरण करून तशी गीते गावून हिंदुस्थानचा रटा लावून लोकांच्या मनावर ते बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय. काँग्रेसचे राहुल गांधी ते भाजपचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असोत की, त्यांच्या पक्षातील स्वार्थी संधी-साधु नेतेमंडळीही यात मागे नाहीत. ते- ही भारत-इंडिया अस आपल्या भाषणात देशाचं नाव न घेता हिंदुस्थानचा नाम जपतात हे देशाचं दुर्दैवचं म्हणावं लागेल. मात्र आज भारत किंवा इंडिया न म्हणता देशाला अन्य नावाने संबोधण्यात येते. हे संविधानाच उल्लंघन नाही की? हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नाहीये का? राजकीय नेत्यांसह चित्रपट निर्माते हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सरासपणे वारंवार करतात तर अजाणतेपणातून भारतीय जनताही करतांना दिसते. मात्र हिंदुस्तान म्हणण्यात काय गैर आहे, असा प्रश्न काही समर्थक उभा करू शकतात. परंतु आपल्या देशात विविध जाती-पंथ- धर्म परंपरा नांदत असून यामुळं त्यांच्यात असुरक्षितेचा भाव निर्माण होऊ नये. यासाठी तत्कालीन घटना समितीतील सदस्यांनी देशाचे नाव  हिंदुस्तान ऐवजी भारत- इंडिया नावावर एकमत झाले होते. मात्र भारतीय लोकांना बेवखुफ बनवून हिंदुस्थान समर्थक बनविण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. हा देश कुठं नेवून ठेवायचा आहे ह्या षड्यंत्रकार्याना? हे जनतेनेच आता ठरवावं.

१८७५ मध्ये आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी 'हिंदू' ही मुघलांनी दिलेली शिवी आहे, असं म्हणत त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. परंतू 'हिंदू' स्थानचा उदघोष करणाऱ्याना नेमकं काय साध्य करायचे आहे. हे भारतीयांनी समजून घेतलं पाहिजे. भगवत गीतेत श्रीकृष्ण संकट येईल, तेंव्हा भारत भूमीवर म्हणण्याऐवजी हिंदुस्तान भूमीवर जन्म घेईल असं भगवत गीतेत म्हटले असते. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाचा काळ असो की, तथागत गौतम बुद्ध यांचा किंवा सम्राट अशोकांंचा काळ म्हणजेच प्राचीन काळापासून आपल्या मातृभूमीला भारतच म्हटलं जातं होत. इतर कोणत्याही नावाने आपल्या देशाचा उल्लेख करण्यात येत नसावा, हे यावरून स्पष्ट होते. देशाला भारत- इंडिया म्हटल तर आपल्या जिभेला विटाळ होईल;  या विकृत मानसिकतेच प्रदर्शन करणारी  काही मूठभर टोळकी. आपल्या सोयी आणि स्वार्थासाठी देशाला हिंदुस्तान बनविण्याच्या कृलुपत्त्या आखत आहेत. या देशातील मुस्लिम, जेन, ख्रिश्चन, बौद्ध, आदिवासी यांच्यात असुरक्षित असल्याची भावना निर्माण करीत देशाची एकता व अखंडतेला खिंडार पाडू पाहत आहेत की काय असा सवाल भारतीयांमधून उपस्थित केला जात असून
 त्यांच्या मनसुब्याला सुजान भारतीय कदापी खतपाणी घालणार नाही, हे मात्र तितकेच खरे..!
पत्रकार राजू जोगदंड

3 comments: