Breaking News

शेतावरून एकाला घरात घुसून कुऱ्हाडीने मारहाण केज मधील घटना,6 जणांविरोधात गुन्हा दाखल

गौतम बचुटे । केज
 शेत नागरण्याच्या कारणावरून केज तालुक्यातील कोठी येथे सहा जणांनी एकाच्या घरात घुसून कुऱ्हाडीने मारहाण करून खिशातील पैसे काढून घेत घरातील वस्तूंची नासधूस केली या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २३ जून रोजी कोठी ता केज येथील किसन ज्ञानोबा डोंगरे यांची शेतजमीन आहे. या शेतीचा मागील बारा वर्षापासुन कोर्टात वाद चालु असुन त्या शेतीचा निकाल किसन डोंगरे यांच्या बाजुने लागलेला आहे. दिनांक २१ जून रोजी सकाळी ११:३० वा. सुमारास ते व त्यांची पत्नी शेत नांगरण्यासाठी गेले असता श्रीहरी मोहन डोंगरे, श्रीनिवास श्रीहरी डोंगरे, ऋषीकेश श्रीहरी डोंगरे, शंकर भाऊराव डोंगरे, सुखमला शंकर डोंगरे याांनी शेत नांगरण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टर आडवुन तुम्ही शेत कसे काय नांगरता? तुम्ही शेत नांगरायचे नाही.
असे म्हणून नांगरणी अडवली.

त्या नंतर दि. २२ जून रोजी किसन डोंगरे हे सकाळी ७:०० वा. सुमारास शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले व कापुस कसा आलाय हे पाहुन मी परत घरी येत असताना गावातील चौकात सकाळी ८:०० वा.  श्रीहरी डोंगरे, श्रीनिवास डोंगरे, ऋषीकेश डोंगरे, शंकर डोंगरे यांनी  गच्चीला याला धरुन खाली पाडुन मारहाण केली. म्हणुन श्रीहरी डोंगरे यानी काठीने मारले व श्रीनिवास डोंगरे, ऋषीकेश डोंगरे, शंकर डोंगरे यांनी दगडाने मारहाण करुन मुक्का मार दिला. यामुळे घाबरून किसन डोंगरे हे जीव वाचवण्यासाठी त्यांची बुलेट मोटारसायकल चौकात सोडुन घराकडे पळत असतांना वरील लोक हे पण त्यांच्या पाठलाग करीत घराकडे पळत होते. तसेच पाठीमागुन दगडाने मारहाण करत होते.श्रीगरी डोंगरे, श्रीनिवास डोंगरे, ऋषीकेश डोंगरे, शंकर डोगरे व त्यांच्या सोबत सुखमला डोंगरे आणि सविता डोंगरे या सहा जणांनी मिळुन घरात घुसून शिवीगाळ केली. तसेच पोलीसांना का बोलावून घेतले?  व आमच्या विरुद्ध पोलीस ठाणेला केस का करतो? असे म्हणुन श्रीहरी डोगरे याने त्याचे हातातील कुऱ्हाड किसन यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली आणि लाथाबुक्कयाने मारहाण केली. त्याची पत्नी अलका ही भांडण सोडवण्यास आली असता तिला पण सुखमल डोंगरे व सविता डोंगरे यांनी लाथाबुक्कयाने व चापटाने मारहाण  केली. तिच्या गळ्याला ओरबडुन तिचे गळ्यातील मंगळसुत्र भांडणात कोठे तरी पडले. किसन हे बेशुद्ध पडले असता खिशातील साडेचार हजार रुपये शंकर डोंगरे यांनी काढुन घेतले. तसेच घरातील टी.व्ही.फोडुन नुकसान केले. या प्रकरणी किसन डोंगरे यांच्या फिर्यादी नुसार श्रीहरी डोंगरे, श्रीनिवास डोंगरे, ऋषीकेश डोंगरे, शंकर डोंगरे, सुखमल डोंगरे व सविता डोंगरे यांच्या विरोधात गु. र. नं. २३३ भा. दं. वि. ३०८, ३२४, ३२३, ३२७, ४५२, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत.

चौकट :-
-----------------------------------------------

केज तालुक्यात शेतीच्या व बांधाच्या कारणावरून गुन्ह्यात वाढ झाली आहे. तसेच असे गुन्हे वारंवार घडत असल्याने मागील रेकॉर्ड प्रमाणे पोलिसांनी प्रतिबंधक कार्यवाही केल्यास गुन्हे कमी होतील.

No comments